Akola : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण तसेच श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. अकोला येथील नाथ शक्तीपीठाचे वेदशास्त्रसंपन्न श्रीकांत शास्त्री गदाधर यांना देखील निमंत्रण पत्र प्राप्त झाले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्यातर्फे पाठविण्यात आलेली निमंत्रण पत्रिका तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र श्रीकांत शास्त्री गदाधर यांना देण्यात आले. अशा ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण मिळणे ही आयुष्यातील अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी 18 जानेवारी रोजी अयोध्या येथे जाणार असल्याचे श्रीकांत शास्त्री यांनी ‘नवस्वराज’शी बोलताना सांगितले.
Ayodhya Ram Mandir : राम बहुजनच; जितेंद्र आव्हाड यांचे आणखी एक वक्तव्य