Home » Nagpur News : लव्ह जिहादविरोधी कायदा करावा; हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

Nagpur News : लव्ह जिहादविरोधी कायदा करावा; हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

by नवस्वराज
0 comment

नागपूर | नागपूर : लव्ह जिहादविरोधी कायदा करावा यासाठी 15 डिसेंबर शुक्रवारी हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आमदार भरतसेठ गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा व उत्तरांचल सरकारने कायदा केला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Hindu Organisation Representative Meet Chief Minister Eknath Shinde at Nagpur & Demanded To Implement Anti Love Jihad Law In State)

कायदा करण्याविषयी शासन गंभीर असून यासंदर्भात बर्‍याच गोष्टी केल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. लवकरच मुंबई येथे बैठक घेऊन त्यात सविस्तर माहिती दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात हिंदू जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद’, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांचे राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने अधिवक्ता वैशाली परांजपे, स्नेहल जोशी, सुनील घनवट, शंकर देशमुख, पराग फडणीस, कमलेश कटारिया, नितीन वाटकर, धनंजय गायकवाड, कैलास देशमुख, सागर देशमुख, आशिष सुंठवाल, गौरव बैताडे, रवी ग्यानचंदानी, उमाकांत रानडे, राहुल पांडे, श्रीकांत पिसोळकर, अभिजीत पोलके आणि करण थोटे यांचा समावेश होता, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी कळवले आहे.

error: Content is protected !!