Home » अकोल्यात मुलाच्या किडनॅपिंगचा फेक मॅसेज व्हायरल

अकोल्यात मुलाच्या किडनॅपिंगचा फेक मॅसेज व्हायरल

by नवस्वराज
0 comment

अकोला : जुने शहर भागातील एका ११ वर्षीय मुलाचे किडनॅपिंग झाल्याचा फेक मॅसेज बुधवारी चांगलाच व्हायरल झाला. या मॅसेजमुळे पोलिस विभागाला चांगलीच डोकेदुखी सहन करावी लागली. यासंदर्भात ‘नवस्वराज’ने डाबकी रोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनघरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हा मॅसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले.

‘आपल्या प्रभागातील रेणुका नगर भागात राहणाऱ्या भांडेकर नामक व्यक्तीच्या ११वर्षीय नातवाला तो शाळेतून सायकल ने घरी येत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे.तसा रिपोर्ट जुने शहर पोलीस स्टेशन ला देण्यात आला आहे.दिनेश काटे याच्या जेथे खाली प्लॉट मध्ये म्हशी बांधलेल्या असतात तेथे ओमनी उभी करून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीजवळ बोलाऊन ओमणी मध्ये ३झनांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओमनीच्या समोर आणि मागे दोन्ही साईड ला नंबर प्लेट नाही. सदर मुलगा कसाबसा निसटून पळत डाबकी रोड पर्यंत आला,अती घाबरलेल्या अवस्थेत तेथे उभ्या असणाऱ्या काही लोकांना तो हा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करत असतांनाच सदर ओमनी रेल्वे गेट च्या दिशेने सुसाट जातांना पाहिल्याचे सांगण्यात येते.सांगण्याचे तात्पर्य हेच की आपण दक्ष राहणे अती आवश्यक झाले आहे.’

अशा आशयाचा हा मॅसेज होता. अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. अकोल्यात मुले पळविणारी कोणतीही टोळी कार्यरत नाही किंवा अपहरणाची कोणतीही घटना घडलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!