Home » सौदीला जाणाऱ्या विमानातून १६ पाकिस्तानी भिकाऱ्यांना खाली उतरवले

सौदीला जाणाऱ्या विमानातून १६ पाकिस्तानी भिकाऱ्यांना खाली उतरवले

by नवस्वराज
0 comment

मुलतान : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. गरीबीमुळे लोकांची दुर्दशा झाली असून दोन वेळच्या जेवणाची सोय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान आता भिकाऱ्यांचा निर्यातदार देश बनला आहे. पाकिस्तानच्या मुलतान विमानतळावर विमानाने सौदी अरेबियाला जाणाऱ्या १६ भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आले.

फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) मुलतान विमानतळावर सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानातून उमरा यात्रेकरूंच्या वेशातील १६ भिकाऱ्यांना खाली उतरवले. पाकिस्तानी वृत्तवाहिनीने एफआयएच्या हवाल्याने सांगितले की यात एक लहान मुल, ११ महिला आणि चार पुरुष आहेत.

या लोकांनी उमरा व्हिसाद्वारे सौदी अरेबियाला जाण्याची योजना आखली होती. इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान चौकशी केली असता आपण भीक मागण्यासाठी परदेशात जात असल्याची कबुली या लोकांनी दिली. भीकेतून मिळणाऱ्या कमाईचा अर्धा भाग त्यांची व्यवस्था करणाऱ्या दलालाला द्यावा लगतो, असे त्यांनी सांगितले. एफआयएने या प्रवाशांना चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी मुलतान येथून अटक केली आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्राल्याच्या सूत्राने सांगितले की, बहुतांश भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकला जाण्यासाठी, हजयात्रेसाठी जारी केलेल्या व्हिसाचा फायदा घेतात व तेथे जाऊन भीक मागतात. अनेक धार्मिक स्थळांवरून पकडलेल्या लोकात पाकिस्तानी नागरीकांची संख्या खूप मोठी आहे.

error: Content is protected !!