अकोला : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली संस्था गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील संगीत विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन भुतेकर, शिवाजी हायस्कूल मालेगाव येथील प्रा. संतोष बावस्कर, श्रीमती आरडीजी महाविद्यालय येथील प्रा. सोनल कामे, खंडेलवाल महाविद्यालयातील प्रा. नीलिमा सरप, जि.प शाळा सोनगिरी येथील शिक्षक रमा रामेश्वर भिसे यांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ ७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंबादास कुलट असतील. प्रमुख पाहुणे म्हणुन उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, अकोला महानगर पालिकेच्या उपायुक्त गीता वंजारी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर उपस्थित राहणार असल्याचे गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले, उपाध्यक्ष वैष्णवी आसेकर, सचिव ईशिका चंदनचक्री, सदस्य दिव्या चव्हाण, सुरभी दोडके, सतीश अस्वार यांनी सांगितले.