Home » नोव्हेंबरमध्ये होणार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणूक

नोव्हेंबरमध्ये होणार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणूक

by नवस्वराज
0 comment

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी 27 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. चार नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

पात्र असणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज बाबत दाखल आक्षेप हरकती संदर्भात एक नोव्हेंबरला कुलगुरू आणि कुलसचिवांच्या समोर निवाडा केला जाणार आहे. चार नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. 20 नोव्हेंबरला सकाळी सात ते पाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. 44 सिनेट सदस्य निवडणुकीत एससी, एसटी, एनटी, ओबीसी, संवर्गासह महिला सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.

44 सदस्य संख्या असणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्यांमध्ये महाविद्यालयीन प्राचार्यांची संख्या 10 असून संस्थाचालक प्रतिनिधी सहा संचालक प्रतिनिधी 10, विद्यापीठ शिक्षक सात पदवीधर, नोंदणी सदस्य 10, विद्वत्त परिषद दोन आणि परीक्षा मंडळाच्या तीन सदस्यांसाठी मतदारांना मतदान करावे लागणार आहे.

error: Content is protected !!