Home » दोन सरकारी बँंकांनी व्याजदर वाढवला, कर्ज महागणार

दोन सरकारी बँंकांनी व्याजदर वाढवला, कर्ज महागणार

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : डझनभर बँकांनी कर्जदरात (एमसीएलआर) वाढ केली आहे. सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकांनी व्याजदरात वाढ केली. यामुळे कर्जदारांना जोरदार झटका बसला आहे. कर्जाचा मासिक हप्ता वाढणार असून नवीन कर्ज देखील जादा दराने घ्यावे लागणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीची झळ तीव्र होऊ लागली आहे. त्याचा फटका वाहन कर्ज, गृहकर्ज, पर्सनल लोन, व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. बँक ऑफ बडोदाने कर्जदरात (एमसीएलआर) ०.१० ते ०.२० टक्के वाढ केली आहे. बँकेच्या संकेतस्थाळावरील माहितीनुसरा बँकेचा एमसीएलआर दर ७.५० टक्के झाला आहे. १२ जून २०२२ पासून सुधारित व्याजदर लागू झाला आहे.

बँक ऑफ बडोदाचा एका दिवसासाठीचा एमसीएलआर दर ६.८० टक्के इतका झाला आहे. एक महिन्यासाठी तो ७. २० टक्के, तीन महिन्यांसाठी ७.२५ टक्के, सहा महिन्यांसाठी ७.३५ टक्के आणि एक वर्षासाठी एमसीएलआर दर ७.५० टक्के इतका वाढला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर दर ७.४५ टक्के इतका वाढवला आहे.

error: Content is protected !!