Home » नागपूरचे बंटी शेळके युवा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव

नागपूरचे बंटी शेळके युवा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव

by नवस्वराज
0 comment

नागपूर : कोरोना काळात अनेकांचे मसिहा बनलेले आणि आपल्या आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जाणारे नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके अखिल भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बनले आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी ही घोषणा केली. कोविड काळात बंटी शेळके यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने नागपुरातील शासकीय इस्पितळांमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अखंड सेवा प्रदान केली. कोविडच्या संपूर्ण काळात शेळके आणि त्यांच्या टीमने अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजनही उपलब्ध करून दिले होते. कोविड काळात खासगी रुग्णालयांकडून केल्या गेलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीविरोधात त्यांनी उपोषणही केले. सध्या नागपुरात बंटी शेळके यांचे आरटीओ विरोधातील आंदोलन गाजत आहे. सोशल मीडियावरही शेळके चांगलेच चर्चेत असतात.

error: Content is protected !!