Home » Shri Ram Navami : श्रीराम उत्सव समितीची कार्यकारिणी गठित

Shri Ram Navami : श्रीराम उत्सव समितीची कार्यकारिणी गठित

Chaitra Celebration: उत्सवाच्या जबाबदारीचे करण्यात आले वाटप

0 comment

Akola : दरवर्षी गांधी चौक परिसरात रामनवमी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करणाऱ्या श्रीराम उत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात नियोजन बैठक 31मार्च रोजी संपन्न झाली.

राम उत्सव समिती मार्गदर्शक मंडळाचे जेष्ठ सेवाभावी पवन पाडिया यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शक मंडळाचे वरिष्ठ सेवाभावी हरीश आलीमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, रामप्रकाश मिश्रा, दीलीप खत्री, विजय तिवारी, हरिश पारवानी, ओमप्रकाश गोयनका, कमल अग्रवाल, बनवारी बजाज, राधेश्याम शर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी विक्रांत देशमुख, कार्याध्यक्षपदी ॲड. पप्पू मोरवाल यांची निवड करण्यात आली.

श्रीराम उत्सव मातृशक्ती समितीच्या संयोजिका म्हणून ममता पसारी व सहसंयोजिका म्हणून दीपिका ठाकूर कामकाज बघणार आहेत. समितीचे संयोजक म्हणून अंबरीश शुक्ला, सहसंयोजक उमेश लखन, शशांक जोशी, राजेश शर्मा, निधी प्रमुख पंकज कागलीवाल, साहित्य वितरण दीपक रूहाटीया, पूजन समिती पंडित श्रीकांत इंदौरिया, सुरेश सिवाल, लाला तिवारी, राम दरबार व्यवस्था प्रमुख धीरज झापर्डे, प्रचार प्रसार ऋषिकेश जकाते, भूषण इंदौरिया, भूमिपूजन बलबीर पारोचे, मूर्ती स्थापना पिंटू उर्फ अरविंद मिश्रा, गणगौर उत्सव राजश्री शर्मा, सुनीता तिवारी, भाविका मिश्रा, कल्पना गावंडे, तरुणा खिलोसिया, निशा कागलीवाल, संगीता शर्मा, कीर्ती नवलकार आदी कामकाज बघणार आहेत. बैठकीला मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!