Home » Akola Police : अकोटच्या बसस्थानकावरून मुलामुलीला घेतले ताब्यात

Akola Police : अकोटच्या बसस्थानकावरून मुलामुलीला घेतले ताब्यात

Missing Case : मुंडगाव, पुणे, मुंबईमार्गे फिरले तपासचक्र

by नवस्वराज
0 comment

Khadan Police Station : अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मुलामुलीच्या जोडप्याला पोलिसांनी अकोट बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. मुंडगाव, पुणे, मुंबईमार्गे अकोट असा तपास पोलिसांनी केला. बेपत्ता झालेले जोडपे अहमदनगर येथुन अकोट बस स्थानकावर आल्याचे कळल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ सूत्रे हालवित जोडप्याला ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर विभागाचे उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उज्ज्वला देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता फुसे, उपनिरीक्षक विजय खर्चे, मनोहर वानखडे, कर्मचारी सूजय मंगरूळकर, धराज चव्हाण, पूनम बचे, अविंद्र खोडे यांनी ही कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून आतापर्यंत 117 गुन्ह्यांमध्ये तपास करण्यात आला आहे. 84 गुन्हे व 33 बेपत्ता झाल्याच्या तक्रारींचा छडा या विभागाने लावला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!