Home » Lok sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची आणखी एक आमदाराने सोडली साथ

Lok sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची आणखी एक आमदाराने सोडली साथ

Eknath shinde : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

by नवस्वराज
0 comment

Mumbai : नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम  सार्वजनिक उपक्रम  मंत्री दादा भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पक्ष एकत्र असताना आपली निवड झाली. पक्षात काम करत असताना दोनवेळा मला शिवसेनेतून उमेदवारी मिळाली. ज्या भागात आपण काम करतो तिथला विचार केला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आपण शिंदे गटात प्रवेश केला आहे. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्या भागातील अनेक कामे प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले. ज्यांनी आमदार केले त्यांच्यासोबत जायला पाहिजे असे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आपण शिंदे यांच्यासोबत आल्याचे पाडवी म्हणाले. काँग्रेस पक्षासोबत शिवसेनेने वर्षानुवर्षे लढा दिला. आता त्याच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याचा आदेश मातोश्रीवरून मिळत असल्याचा विषय आला तेव्हा  आपण योग्य तो निर्णय घेतल्याचे पाडवी यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!