Home » Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nayab Udhas : पंकज उधास यांच्या कन्या नायाब उधास यांनी दिले वृत्त

by नवस्वराज
0 comment

Mumbai : लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (ता. 26) निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायाब उधास यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले असून बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.  त्यांचे ‘चिठ्ठी आयी हैं’ हे त्यांचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्याने त्यांना चांगलीच ओळख मिळवून दिली.

पंकज उधास यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘सगळ्यांना हे सांगायला खूप दु:ख होत आहे की पद्मश्री पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. दीर्घकाळ ते आजारी होते’, अशी पोस्ट नायाब यांनी शेअर केली आहे. पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. 1980 मध्ये ‘आहत’ नावाच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाण्या च अल्बम चांगलेच लोकप्रिय झाले.

गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. ‘चिठ्ठी आयी है’ या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहोचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.

error: Content is protected !!