Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला सभामंडप कोसळला. यात चार कामगार जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची जाहीर सभादेखील होणार आहे. यासाठी भारी या गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिलर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले. पिलर कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच हा अपघात घडला आहे. सभेसाठी डोम उभारले जात असतानाच त्याचे तीन पिलर खाली कोसळले. यावेळी तिथे काम करणारे काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा जिल्ह्यात
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचे दावेदार असताना त्यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी ते आले होते. आता चौथ्यांदा ते लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला मेळाव्यासाठी यवतमाळला येत आहे.