Home » Maratha Reservation : खासगी बस अडवली, महिला प्रवासी संतप्त थेट आंदोलकांशी भिडली

Maratha Reservation : खासगी बस अडवली, महिला प्रवासी संतप्त थेट आंदोलकांशी भिडली

Viral Video : महिलेचा रुद्रावतार पाहून अनेकांना धडकी

by नवस्वराज
0 comment

Nanded : खासगी बसमधील एका महिलेच्या आजारी मुलाला नांदेड येथे रुग्णालयात नेण्यात येत होते. परंतु मराठा आंदोलकांनी हदगाव तालुक्यातील मनाठा पाटीजवळ रस्त्यात बस अडवली. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. विनंती करुनही बस जाऊ दिली जात नसल्याने या महिलेसोबत असलेल्या इतर महिला बसच्या खाली उतरल्या, त्यांची आंदोलकांसोबत झटापट झाली.

नेमके काय झाले?

अनेक जिल्ह्यात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मराठा समाजाने आंदोलन केले. हदगावहून नांदेडकडे एक खासगी बस जात असतांना, ही बस मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवली. यावेळी मराठा आंदोलकांसोबत महिलांची झटापट झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खासगी बसमधील एका महिलेच्या आजारी मुलाला नांदेड येथे रुग्णालयात नेण्यात येत होते, असे सांगण्यात येत आहे. परंतु मराठा आंदोलकांनी हदगाव तालुक्यातील मनाठा पाटीजवळ रस्त्यात बस अडवली. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. विनंती करुनही बस जाऊ दिली जात नसल्याने या महिलेसोबत असलेल्या इतर महिला बसच्या खाली उतरल्या, त्यांची आंदोलकांसोबत झटापट झाली.

लातूर शहरातही  मराठा आंदोलकांच्यावतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनादरम्यान अडकलेल्या गाड्या सोडण्यावरून पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झाली. पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षकांची गाडी देखील या चक्का जाम आंदोलनात अडकली होती. पोलिसांनी इतर वाहने काढत पोलिस अधीक्षकांची गाडी बाहेर काढली. पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना अडचण होत असल्याचे सांगत मराठा आंदोलकांना विनंती केली. मात्र आंदोलक चक्का जाम करण्यावर ठाम होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!