Home » गडचिरोलीतील ४१ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शौर्यपदक

गडचिरोलीतील ४१ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शौर्यपदक

by नवस्वराज
0 comment

डचिरोली : माओवाद्यांच्या कारवाया मोडीत काढत शौर्य गाजविणाऱ्या गडचिरोतील ४१ पोलिस अधिकाऱ्यांना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली.

पाच माओवाद्यांचा खातमा करणारे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. कलवानिया सध्या औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक संदीप भांड, संदीप मंडलिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजने, मोतीराम मडावी, योगीराज जाधव, पोलिस उपनिरक्षक राजरत्न खैरनार, दयानंद महाडेश्वर, हर्षल जाधव, शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (मरणोत्तर), शहीद पोलिस हवालदार जगदेव मडावी (मरणोत्तर), पोलिस हवालदार सेवकराम मडावी, नाईक पोलिस शिपाई राजू कांदो, दामोधर चिंतुरी, राजकुमार भलावी, सागर मुल्लेवार, शंकर मडावी, रमेश आसम, जीवन उसेंडी, राजेंद्र मडावी, मनोज गज्जमवार, सुभाष वाढई, दसरू कुरसामी, पोलिस शिपाई अविनाश कुमरे, गोंगलु तिम्मा, महेश सयाम, साईकृपा मिरकुटे, रत्नय्या गोरगुंडा, विलास पदा, मनोज इस्कापे, अशोक मज्जी, देवेंद्र पाकमोडे, रोहित गोंगले, दीपक विडपी, सूरज गंजीवार, शहीद पोलिस शिपाई किशोर आत्राम (मरणोत्तर), योगेश्वर सडमेक, अंकुश खंडाळे, गजानन आत्राम या जवानांना पोलिस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

सहाय्यक फौजदार प्रविण बेझलवार, प्रमोद ढोरे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती ‘गुणवत्तापूर्ण सेवापदक’ जाहीर झाले आहे. पदक प्राप्त करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!